Mumbai News  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : बोगस डॉक्टरने केला तरुणीवर बलात्कार, नालासोपार्‍यातील घटनेने खळबळ

Mumbai Crime News : नालासोपारा येथे एका बोगस डॉक्टरने २२ वर्षीय तरुणीवर उपचाराच्या नावाखाली बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. बाबासाहेब पाटील असं या डॉक्टरचे नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महेंद्र वानखेडे,नालासोपारा

नालासोपारा येथे एका बोगस डॉक्टरने २२ वर्षीय तरुणीवर उपचाराच्या नावाखाली बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. बाबासाहेब पाटील असं या डॉक्टरचे नाव आहे. नालासोपारा पश्चिमेच्या छेडानगर मधील गौरव गॅलक्सी इमारतीत त्याचा दवाखाना आहे. सोमवारी २२ वर्षीय तरुणी उपचारासाठी आली होती. त्यावेळी पाटील याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून बलात्कार केला. बाबासाहेब पाटील याच्याविरोधात बलात्कार (कलम ३७६) आणि विनयभंगाचा (कलम ३५४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब पाटील नाशिकचा असून दर आठवड्याला नालासोपाऱ्यात उपचारासाठी येत असल्याचं इमारतीतील रहिवाशांनी सांगितलं. पाटील हा डॉक्टर नसून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही. मात्र तो वैद्य असल्याचा दावा करून मागील ३० वर्षांपासून मुळव्याधीवर उपचार करत असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहाय्याक पोलीस निरीक्षक प्रमोद कदम यांनी दिली.

आजोबाकडून नातीवर अत्याचार

अकोला जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आजोबानं १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवलं. चुलत आजोबाने नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वयाच्या साडे १७ वर्षांपासून चुलत आजोबाकडून ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता. या पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका तरुणांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी गरोदर राहिली. सद्यस्थितीत पीडित मुलीचे वय १८ असून ती ९ महिन्याची गरोदर आहे. या प्रकरणी खदान पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT