कुर्लामध्ये बेस्ट बसला झालेल्या अपघातानंतर या बससंदर्भात अनेक धक्कादायक व्हिडीओ आणि माहिती समोर येत आहेत. या अपघाताचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर अंधेरीमध्ये ड्युटीवर असताना बेस्ट बसचा चालक वाईन शॉपमध्ये जाऊन दारू खरेदी करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यावरून बेस्ट बसच्या चालकांच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते.
असे असताना बेस्ट बस चालकाचा अशाचप्रकारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. ड्युटीवर असलेला बेस्ट बसचा चालक पुन्हा एकदा वाईन शॉपवर गेल्याचा हा व्हिडीओ आहे. वांद्रे पश्चिमेचा हा व्हिडीओ असल्याचे समजत आहे. वाईन शॉपवर बिअर घेताना या बस चालकाला नागरिकांनी रंगेहात पकडले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की ड्युटीवर असलेला बेस्ट बसचा चालक रस्त्याच्या कडेला बस थांबवून वाईन शॉपमध्ये जातो. या ठिकाणी तो दारूची बाटली खरेदी करतो आणि ती सोबत घेऊन येतो. काही नागरिकांनी या बस चालकाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला. हा बस चालक दारूची बाटली विकत घेतो आणि बसमध्ये जाऊन बसतो. नागरिकांनी या चालकाला आणि वाहकाला जाब विचारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मी दारू प्यायलो नाही, तुम्ही माझ्या तोंडाचा वास घेऊ शकता असे हा चालक नागरिकांना बोलताना दिसत आहे. पण संतप्त नागरिक त्याला बसमधून खाली उतरवून जाब विचारताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ड्युटीवर असताना अशापद्धतीने दारू खरेदी करणे अथवा दारू प्यायल्यामुळे हे बेस्टचे कर्मचारी प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा प्रकार वारंवार समोर येत आहेत.
दरम्यान, कुर्लामध्ये बेस्ट बसला सोमवारी रात्री भीषण अपघात झाला होता. भरधाव बसने अनेक वाहनांना धडक दिली होती. या अपघातामध्ये अनेक जण चिरडले गेले होते. या अपघातामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर ४९ जण जखमी झाले होते. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या अपघाताचे दोन थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या सायन, भाभा रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयात देखील उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. बस चालाकाला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.