Shivajinagar Police Station  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: भावंडांसोबत लपाछपी खेळताना अनर्थ घडला, दोरीचा फास लागल्याने चिमुकलीचा मृत्यू

Mumbai Crime News: आकृती आपल्या भावंडांसोबत खेळत असताना या मुलीला दोरीचा फास लागला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईच्या गोवंडीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लपाछपी खेळत असताना ९ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. आपल्या भावंडांसोबत खेळत असताना या मुलीला दोरीचा फास लागला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीच्या शिवाजीनगरमधील बैंगनवाडी परिसरामध्ये आकृती सिंह ही ९ वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. आकृती रविवारी आपली भावंड आणि शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत घरामध्येच लपाछपी खेळत होती. यावेळी पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास आकृतीच्या गळ्याभोवती लागला.

आकृतीच्या मोठ्या बहीणीने तात्काळ घराबाहेर धाव घेत शेजारच्यांना बोलावून आणले. आकृतीच्या आईने आणि शेजारच्यांनी तिच्या गळ्याभोवती लागलेला फास काढून रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी आकृतीला मृत घोषीत केले. या घटनेमुळे आकृतीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी तपास केला तर मुलीचा मृत्यू दोरीचा फास लागल्यामुळे झाल्याचे समार आले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे गोवंडी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT