Mumbai Audi Car Hit And Run Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Hit And Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार, भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना उडवलं, अपघातानंतर चालक फरार

Mulund Audi Car And Auto Rickshaws Accident: मुंबईच्या मुलुंडमध्ये भरधाव ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातामध्ये ४ जण जखमी झाले आहेत. यामधील एकाची प्रकृती गंभीर आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

मुंबईतल्या वरळीमध्ये ऑडी कारने दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मुलुंडमध्ये भरधाव ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघाताचा तपास मुलुंड पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. ऑडी कारने दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही रिक्षाचे चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर आहे. चौघांवर देखील सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर ऑडी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघतामध्ये दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. जखमी प्रवाशांना आणि रिक्षा चालकाला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मुलुंड पोलिसांनी ऑडी कार ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली होती. भरधाव ऑडी कारने दुचाकीवरून जाणाऱ्या नवरा-बायकोला चिरडले होते. वरळीच्या अट्रिका मॉलजवळ हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या महिलेला ऑडी कार चालकाने १ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. कारचालक दारूच्या नशेमध्ये होता. याप्रकरणी कारचालक मिहीर शहाला (२४ वर्षे) वरळी पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT