Mulund Truck And Bike Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Hit And Run: मुलुंडमध्ये हिट अँड रनचा थरार, ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू

Mulund Truck And Bike Accident: मुलुंड पश्चिमेला हिट अँड रनमध्ये महिला शिक्षिका अमृता पूनमिया यांचा जागीच मृत्यू झाला. फरार ट्रक चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

Priya More

मुंबईमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये ३४ वर्षांच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती आणि मुलगी जखमी झाले आहेत. मुलुंड पश्चिमेला ही हिट अँड रनची घटना घडली आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेला हिट अँड रनमध्ये महिला शिक्षिका अमृता पूनमिया यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पती आणि मुलगी जखमी झाला आहे. मुलुंड- गोरेगाव लिंक रोडवर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिस आरोपी ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेला एटीगेटेड कमल सोसायटीमध्ये राहणारे विशाल पुनमिया हे आपली पत्नी अमृता आणि मुलीसोबत दुचाकीवरून तांबेनगरच्या दिशेने जात होते. यावेळी मुलुंड- गोरेगाव लिंक रोड परिसरामध्ये पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला.

ही धडक इतकी जोरात होती की अमृता रस्त्यावर खाली पडल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्या. चाकाखाली चिरडल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमी अमृता, तिचे पती आणि मुलीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अमृता यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे पुनमिया कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलुंड पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे मुलुंडमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT