Nylon Manja, Nashik, Makar Sankranti saam tv
मुंबई/पुणे

Borivali News: हृदयद्रावक! मांजाने गळा कापला, २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू; बोरीवलीतील घटना

Borivali News: मुंबईच्या बोरीवली (Mumbai) भागात मांजाने गळा कापून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाण पुलावर ही घटना घडली.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता.१५ जानेवारी २०२४

Borivali Breaking News:

आज देशभरात मकर संक्रातीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मकर संक्रातीच्या मुहूर्तावर पतंग उडवण्याचीही लगबग सुरू आहे. मात्र पतंगाच्या चाजनीज मांजाने अनेकांसाठी जीवघेणा ठरल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंबईमधून अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईच्या बोरीवली भागात मांजाने गळा कापून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या बोरीवली (Mumbai) भागात मांजाने गळा कापून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाण पुलावर ही घटना घडली. मोहम्मद शेख फारुकी असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मोहम्मद शेख हा तरुण आपल्या दुचाकीवरुन कोरा केंद्र उड्डाण परिसरातून जात असताना त्याचा पतंगाच्या मांजाने गळा कापला. या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी पतंग उडवणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नायलॉन मांजा ठरतोय पक्षांसाठी कर्दनकाळ!

मकर संक्रातीनिमित्त नाशिक शहरातील (Nashik) आकाश आज (साेमवार) रंगबिरंगी पंतगांनी (kite) न्हाऊन गेले. नायलॉन मांजामुळे नाशिकरांची पतंगबाजीची हौस पक्षांसाठी मात्र कर्दनकाळ ठरली. नायलॉन मांजमुळे नाशकात अनेक पक्षी जायबंदी झालेत. आतापर्यंत ४ ते ५ पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. नायलॉन मांजात अडकल्यानं अनेक पक्षांना गंभीर इजा देखील झाली आहे.

हिंगोलीमध्ये भीषण अपघात..

हिंगोलीमध्ये (Hingoli Accident) एक विचित्र अपघाताची घटना समोर आलीये. दोन दुचाकींचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी आहेत. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर पाटी जवळ हा भीषण अपघात झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT