Mahalakshmi Race Course Saam Tv
मुंबई/पुणे

Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा अखेर BMC कडे, राज्य सरकारने दिली मंजुरी; पाहा VIDEO

Mahalakshmi Race Course Land Handed Over To BMC: महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बीएमसीला देण्यात आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन तयार केले जाणार आहे.

Priya More

गिरीष कांबळे, मुंबई

मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. महालक्ष्मी रेस कोर्सची (Mahalakshmi Race Course) 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या (BMC) ताब्यात देण्यास राज्य सरकारने (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी वापरली जाणार आहे. राज्य सरकारने रेस कोर्सची जागा मुंबई महानगर पालिकेला देण्यास मंजुरी दिल्यामुळे थीम पार्कचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

दक्षिण मुंबईतील मोक्याची महालक्ष्मी रेस कोर्सची एकूण 211 एक्कर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ 1914 साली भाडे करारावर देण्यात आली होती. 99 वर्षांचा हा करार 2013 साली संपुष्टात आला होता. आता कराराची मुदत संपल्यानंतर या जागेपेक्षा 120 एकर जागा राज्य सरकारमार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सची एकूण 211 एकची जागा आहे. यातील 120 एकर जागा मुंबई महानगर पालिकेला देण्यात येणार आहे. तर उर्वरित 91 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेकरारावर देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या या मंजुरीमुळे मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन आणि ओपन स्पेससाठी सुविधा करण्यात येणार आहेत. तसंच, अडग्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेत मुंबई महानगरपालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यास 11 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर जागेवर न्यूयॉर्क (अमेरिका), लंडन इंग्लंड (यूके) येथील पार्कच्या धर्तीवर हा थीम पार्क विकसित केला जाणार आहे. बीएमसीकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क येथे उभारले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT