mumbai nashik kasara manmad railway project news  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai-Nashik Railway : मुंबई-नाशिक रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार; २४ किलोमीटरचा बोगदा, २३९ पूल आणि २१ भुयारी मार्ग

Mumbai - Nashik Kasara Manmad Railway Project : मुंबई-नाशिक रेल्वे प्रवास होणार वेगवान! कसारा-मनमाड मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी ४५ गावांतील ३३४ हेक्टर जमीन संपादित होणार.

Alisha Khedekar

  • मुंबई-नाशिक रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी कसारा-मनमाड मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचे नियोजन

  • प्रकल्पासाठी सुमारे १० हजार १४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

  • नाशिकसह पाच तालुक्यांतील ४५ गावांमधून ३३४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण होणार

  • पुढील पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो आता तुमचा प्रवास वेगवान होणार आहे. कारण कसारा-मनमाड रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिकसह पाच तालुक्यांमधील ४५ गावांतील जमिनींचे अधिग्रहण केले जाणार आहे. या माध्यमातून एकूण ३३४ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे १० हजार १४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कसारा ते मनमाडदरम्यान सुमारे २४ किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे मार्गावर २१ भुयारी मार्ग, २३९ पूल आणि पाच बोगदे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सध्या मुंबई आणि नाशिकदरम्यान रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण आहे. तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका सुरू झाल्यानंतर हा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे शक्य होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल. मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे संपर्कही अधिक मजबूत होणार आहे.

या प्रकल्पाचा फायदा केवळ प्रवासी वाहतुकीलाच नव्हे, तर मालवाहतुकीलाही होणार आहे. या मार्गावरून दरवर्षी अतिरिक्त ४ कोटी ६१ लाख टन मालाची वाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार आणि शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी चालना मिळेल. तसेच उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, कसारा-मनमाड रेल्वे मार्गावरील तिसरी आणि चौथी मार्गिका पूर्ण झाल्यास मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रादरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद होण्यासोबतच प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमताही वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरकरांना वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवेची भेट; दहा रुपयात करता येणार प्रवास

Political Bhaubeej: मुंडे, तटकरे, पेडणेकरांसह राजकीय नेत्यांनी साजरी केली भाऊबीज; पाहा खास क्षणांचे फोटो

मॉर्निंग वॉक करताना माजी उपराष्ट्रपती अचानक कोसळले; थेट एम्समध्ये दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

High Cholesterol : कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश

Shocking : जन्मदाताच झाला हैवान! पोटच्या मुलींवर अत्याचार; नागपूर, शिरूरमधील घटनांनी महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT