Mumbai News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : 'मातोश्री'पासून हाकेच्या अंतरावरील ठाकरे गटाच्या शाखेवर हातोडा; मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

Political news : दोन बुलडोझरच्या साहाय्याने या शाखेवर महापालिकेने पाडकामाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mumbai News : मुंबई महापालिकने शिवसेनेच्या ठाकरे गटाला दणका दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वांद्रे पूर्व परिसरातील शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केला आहे.

वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेवर मुंबई महापालिकेचा मोठ्या पोलीस बंदोबस्तात हातोडा चालवला आहे. दोन बुलडोझरच्या साहाय्याने या शाखेवर महापालिकेने पाडकामाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 'मातोश्री'पासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. (Latest Marathi News)

वांद्रे पूर्व परिसरात रेल्वे स्टेशनजवळ रिक्षा स्टँड आहे. त्याच ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरचं कार्यालय आहे. त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

वॉर्ड क्रमांक 96 चे माजी नगरसेवक हाजी हलीम खान हे ह्या कार्यालयातून काम करतात. तसेच फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. ही शाखा ४० वर्ष जुनी आहे, असा ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे. मात्र ही शाखा बेकायदेशीर असल्याने मुंबई महापालिकेने ही तोडक कारवाई हाती घेतली आहे.

घटनेची माहिती मिळतात परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कारवाईबाबत जाब विचारण्याचाही प्रयत्न केला. अधिकारीही शांतपणे कार्यकर्त्यांना उत्तरे देताना दिसले. (Political News)

मात्र या कारवाईमुळे शिंदे आणि ठाकरे पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या घटनेचे राजकीय पडसाद येत्या काळात उमटणार हे मात्र नक्की आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT