Mumbaikar Get New Mithi River Bridge Saam
मुंबई/पुणे

मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

Mumbaikar Get New Mithi River Bridge: धारावीतील जुना मिठी नदीवरील पुल पाडून नवीन पुल उभारला जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुलाची उंची आणि रूंदी वाढवली जाणार आहे.

Bhagyashree Kamble

  • जुना मिठी नदीवरील पूल पाडून नवीन पूल उभारला जाणार.

  • पूलाच्या कामासाठी ३०३ कोटी खर्च अपेक्षित.

  • नवीन कंत्राटदाराला काम देण्यात आलं.

मुंबईकरांसाठी खूशखबर. मिठी नदीवरील जुना पूल पाडण्यात येणार आहे. धारावी येथील ड्राइव्ह इन थिएटरजवळ नवीन पूल उभारला जाणार आहे. या पुलाच्या कामासाठी मुंबई महापालिकेनं कंत्राटदाराची निवड केली असून, या पुलाच्या कामासाठी साधारण ३०३ कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, या नवीन पूलामुळे वाहतूक कोंडी दूर होईल.

मिठीनदीवरील पुलासाठी मुंबई महापालिकेनं विस्तृत आराखडा तयार केला आहे. जुलै २००५ साली आलेल्या अतिवृष्टीनंतर तथ्य शोधन समितीची स्थापना डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. या समितीनं त्यावेळी मिठी नदीचं पात्र ६८ मीटरवरून १०० मीटरपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती.

या शिफारशीनुसार, शीव- धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रे यांना जोडणाऱ्या पुलाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. तसेच रूंदी वाढवण्यात येणार आहे. ही कामे दोन टप्प्यात पार पडणार आहे. वांद्रे पूर्व येथील ड्राइव्ह इन थिएटरजवळून मिठी नदी वाहते. या नदीवरील पुलावरून वाहतूक होती. मात्र, वाहनांची प्रचंड गर्दी होते. यामुळे पुलाची रूंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

सध्या जुन्या पुलाची रूंदी ९.३ मीटर आहे. तर, लांबी १०८ आहे. नवीन पुलाच्या कामानंतर रूंदी ४८ मीटर होईल. यापुलामुळे बीकेसी, शीव अशा ठिकाणी जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सोपा होईल. नव्या पुलाच्या कामासाठी कंत्राटदार निवडण्यात आला आहे. पुलाच्या पुनर्बांधणी करण्यासाठी ३०३ कोटी ९५ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. हा नवीन पूल २ वर्षांत उभारण्याचे उद्दीष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT