Aarey to BKC Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Aarey to BKC Metro : आरे ते बीकेसी मेट्रो धावणार! तिकीट फक्त 10 रुपये, कुठे थांबणार, कधी होणार सुरू? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai Metro 3 Phase 1: आरे ते बीकेसी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. याचे तिकीट भाडे किती असेल? किती स्टेशनवर ही मेट्रो थांबनावर? याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

गिरीश कवडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mumbai Metro 3's Aarey Colony to Bkc Line to Be Inaugurated Soon: मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबईत लवकरच भूमिगत मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो सेवा आरे ते बीकेसीदरम्यान सुरू होणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नोकरीसाठी बीकेसीला येणाऱ्यांची वाहतुकीच्या समस्येतून सुटका होणार आहे.

मेट्रो 3 मार्गाची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत होते. या मेट्रो लाईनचे काम पूर्ण झालं असून याच उद्घाटनही पुढील महिन्यात होऊ शकते. याचबद्दल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) एमडी अश्विनी भिडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे.

किती असणार स्टेशन, कधी होणार सुरू?

माध्यमांशी संवाद साधताना अश्विनी भिडे म्हणाल्या आहेत की, ''मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा आरे ते बीकेसीपर्यत आहे. मुंबईतील संपूर्ण भूमिगत ही मेट्रो 3 असणार आहे, आरेपासून बीकेसीदरम्यान याचे 10 स्टेशन आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लाईन सुरु होईल. काही डॉक्युमेंटेशन सुरु आहे, त्यानुसार पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असा आमचा अंदाज आहे.''

किती असेल तिकीट भाडं?

नवीन मेट्रोच्या तिकीट भाड्याबद्दल माहिती देताना अश्विनी भिडे म्हणाल्या की, ''याचे दरदिवशी 96 ट्रिप होणार आहेत. या लाईनवर एकूण 9 गाड्या सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत धावणार. यामध्ये 48 ट्रेन कॅप्टन आहेत. त्यापैकी 10 महिला आहेत. तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी कमीत कमी 10 रुपये असणार आहे आणि जास्तीत जास्त 50 रुपये असेल. ट्रेनचं काम पूर्ण होईल तेव्हा तिकीटचे दर जास्तीत जास्त 70 रुपये असेल.''

अधिक माहिती देताना अश्विनी भिडे यांनी सांगितलं की, ''या मेट्रोचा फेज दोन हा मार्च ते मेपर्यंत पूर्ण होईल, असा आमचा अंदाज आहे. या टप्यात मोठं मोठी स्थानक आहेत, त्यामध्ये वरळी आणि गिरगांव येथे मोठी आव्हान आहेत. बीकेसी ते कफ परेड हा टप्पा मार्च ते एप्रिल 2025 पर्यत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. वरळी नाका आणि गिरगांव स्टेशन ही चॅलेंजिंग स्टेशन आहेत. त्यांचे काम जर डिसेंबरपर्यत झाली, तर पूर्ण मेट्रोचं पुढचं काम हे मार्च 2025 पर्यत पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT