Mumbai Metro 3 Phase 1  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Metro-3 Opens Today: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर, भुयारी मेट्रो आजपासून धावणार!

Namdeo Kumbhar

Mumbai Underground Metro: मुंबईकरांचे भुयारी मेट्रोने प्रवासाचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला झाली झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मार्गिकेच लोकार्पण केले होते. सोमवारी सकाळी ११ वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे

जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो (Underground Metro) सुटणार आहे. आठ डब्यांची स्वयंचलित मेट्रो धावणार आहे, अशी मेट्रो ट्रेन धावणारी ही देशातील पहिली लाईन असेल.

मेट्रो ३ मधील पहिला टप्पा 12.5 किलोमीटर लांब पल्ल्याचा आहे. सोमवारपासून सुरु होणाऱ्या या मेट्रो मार्गिकेवर दहा स्टेशन असतील. मेट्रो ३ मार्गिकेचा पुढील टप्पा मार्च २०२५ पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रो ३ लाइन दक्षिण मुंबईमध्ये कुलाबापर्यंत जाणार आहे. 33.5 किलोमीटर लांब असणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्ज मेट्रो मार्गाचे लोकार्पण 26 ऑगस्ट 2014 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले होते. (Mumbai Metro Aqua Line – Info, Route Map, Fares, Tenders & Updates)

खास अॅप -

मेट्रो कनेक्ट २ हे अॅप एमएमआरसीएलद्वारे सुरु कऱण्यात आलेय. या अॅपच्या माध्यमातून जवळचे मेट्रो स्थानक, तिकिट दर, गाड्यांचं वेळापत्रक समजणार आहे. हे अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत असेल. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशी तक्रारीही नोंदवू शकतात.

प्रवासी मोबाईल ऍप्लिकेशन, तिकीट काउंटर, तिकीट वेंडिंग मशीन आणि एमएमआरसी वेबसाइटवरून एकेरी आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे खरेदी करू शकतात. येण्या-जाण्याच्या प्रवासासाठी तिकिटे ३ तास वैध राहतील. स्थानकांमध्ये तिकीट खरेदी करणारे प्रवाशी त्यांचे तिकीट कोणत्याही अडचणीशिवाय बुक करण्यासाठी उपलब्ध मोबाईल आणि वायफाय नेटवर्क वापरू शकतात.

मेट्रोची वेळ आणि तिकिटाचे दर काय ? Mumbai metro line 3 timings and ticket price

आरे ते बीकेसी या मार्गावरील मेट्रो सकाळी 06.30 ते रात्री साडे 10 वाजेपर्यंत धावणार आहे. विकेंडला सकाळी 8.30 वाजता पहिली मेट्रो धावेल, रात्री साडे दहा वाजता अखेरची मेट्रो असेल. या मार्गावर मेट्रोच्या प्रतिदिवस ९६ फेऱ्या असतील. प्रत्येक ७ मिनिटांला मेट्रो धावेल. आरे-बीकेसी मार्गावर तिकिटाचे दर दहा रुपये ते ५० रुपये यादरम्यान असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratan Tata: त्या फक्त अफवाच, माझी प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेवू नका - रतन टाटा

Pandharpur Politics: उत्तम जानकरांना मोठा धक्का, माळशिरसमध्ये भाजप अन् आणखी एका पक्षाकडून तगडे आव्हान

Dates Benefits: रोज एक खजूर खा अन् आजारापासून दूर राहा; आरोग्यदायी फायदे वाचा

Nagpur Crime: नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्णाचा चौघांवर हल्ला; दोघांचा मृत्यू

Indapur News : इंदापुरात दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील; पक्षप्रवेशानंतर उमेदवारी जाहीर होणार?

SCROLL FOR NEXT