Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro : मेट्रो 2B चा पहिला टप्पा कधी सुरू होणार, तारीख आली समोर, चेंबूरकरांना फायदाच फायदा

Mumbai Metro 2B phase one start date and station list : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 2B चा पहिला टप्पा या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. मंडाला ते चेंबूर हा 5.6 किमीचा मार्ग तयार असून एमएमआरडीएकडून सीएमआरएसचे प्रमाणपत्र मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Namdeo Kumbhar

When will Metro 2B Mumbai start for public : लवकरच मुंबईमध्ये आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महिन्यातच उद्घाटन होणार होते. पण काम पूर्ण झालं नसल्याने उद्घाटन सुरू झाले नाही. पण आता मेट्रोच्या 2B चं काम जवळपास पूर्ण झालेय. मंडला ते चेंबूर हा मेट्रो मार्ग या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

मेट्रो 2B चा पहिला टप्पा सुरू करत मुंबईकरांना खूशखबर देण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मेट्रो-3 कॉरिडोरनंतर एमएमआरडीएकडून मेट्रो-2Bचा पहिला टप्पा सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या माहितीनुसार, मेट्रो2B मधील मंडाला (मानखुर्द) ते डायमंड गार्डन मार्ग (चेंबूर) पर्यंत मेट्रो धावणार आहे. यासाठी सीएमआरएसकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पहिल्या टप्प्यात 5.6 किमीचा मार्ग सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्डाकडून (सीएमआरएस) अनिवार्य सर्टिफिकेट मिळवले आहे. सध्या साफ-सफाई अन् पेटिंगचे काम सुरू आहे. पुढील १० ते १५ दिवसात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.

ऑक्टोबर अखेर सुरू होणार मेट्रो 2B -

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर अखेरपर्यंत मेट्रो 2B सर्वसामान्य प्रवासांसाठी सुरू होईल. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी शनिवारी मेट्रो 2B चा आढावा घेतला. या मार्गावर एप्रिल २०२५ पासून चाचपणी सुरू होती. आता पुढील १५ दिवसात मेट्रोचा हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रोचा हा मार्ग खुला करण्यात येईल.

पहिल्या टप्प्यात कोणकोणती स्थानकं? Mumbai Metro 2B phase one start date and station list

डीएन नगर ते मंडाला यादरम्यान 23.6 किमी लांब मेट्रो मार्ग सुरू होत आहे. या मार्गावरील सिव्हिल काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या पहिल्या टप्प्यात 5.6 किमी मार्गावर मेट्रो सुरू करण्यात येत आहे. या मार्गावर मंडाला, मानखुर्द, बीएसएनएल, छत्रपति शिवाजी महाराज चौक आणि डायमंड गार्डन ही स्टेशन असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT