Mega Block news saam tv
मुंबई/पुणे

Mega Block: चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; रविवारी या मार्गांवर मेगाब्लॉक,जाणून घ्या पर्यायी मार्ग

मुंबईत रविवारी २८ जुलै रोजी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठीआपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

सुमित सावंत

Mumbai Mega Block News : मुंबईत रविवारी २८ जुलै रोजी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठीआपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मात्र, रविवारी मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घोषित करण्यात आला नाही.

रविवारी मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आलेला नाही. येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत या कालावधित मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

त्यामुळे ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव करीताच्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.हार्बर मार्गावरील प्रवाशांना दि. २८.८.२०२२ रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: एमआयएमच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूर हादरलं!

Panvel Fort : पनवेलजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा, सह्याद्रीत लपलाय १८व्या शतकातील भव्य इतिहास

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये ढगफुटीचा तडाखा; धबधब्यावर आलेले पाच पर्यटक पुरात वाहून गेले, एकाचा मृत्यू

Gurupournima 2026 : गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? काय आहे महत्त्व?

CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एंट्री; 100% पेट्रोलसाठी सोशल मीडियावर मोहीम

SCROLL FOR NEXT