Marathi Patya in Mumbai, BMC News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Marathi Patya Update : मराठी पाट्यांसाठीची मुदत संपली, BMCकडून आजपासून कायदेशीर कारवाई होणार

Mumbai Marathi Patya News : मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बैठक घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

राज्यातील दुकाने तसेच आस्थापनांवर मराठी पाट्या बंधनकारक असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. मराठी पाट्या बसवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने तीन दिवस अधिक मुदत दिली होती. ही मुदत आज संपत असल्याने मुंबई महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरुन कारवाई करणार आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बैठक घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर तसेच आस्थापनांवर आजपासून मुंबई महानगरपालिका कारवाई करणार आहे. प्रत्येक आस्थापनेला दोन हजार रूपये दंड ठोठावला जाईल. तरी देखील पाट्या न बदलल्यास दुकानाचा परवाना देखील रद्द करण्यात येणार आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या  निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेतील पाट्या लावणे बंधनकारक आहे. त्‍यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील पथक गठीत करण्यात आले आहे. त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील मराठी पाट्यांचा मुद्दा उचलला असून पाट्या न बदलल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. देवनागरी भाषेतील मराठी पाट्या बसवण्यासाठी २५ नोव्हेंबर ही तारीख सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली होती. मात्र तरीही काही दुकाने अशी आहे ज्यांनी अजूनही त्यांच्या पाट्या बदललेल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT