ED Board In Mantralaya Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मंत्रालयात आता ED चे सरकार; सहाव्या मजल्यावर लागला बोर्ड

मंत्रालयात सहाव्या मजल्यावर ED X असे बोर्ड लावण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

ED Board In Mantralaya : राज्यासह देशभरात सध्या ईडी (ED) कारवायांना वेग आलाय. अनेक राजकीय नेते, उद्योगपती तसेच बॉलिवूड अभिनेते ईडीच्या रडावर आहे. ईडीच्या कारवायामुळे काही मंत्री तुरूंगात देखील आहे. त्यातच आता मुंबई येथील मंत्रालयात सहाव्या मजल्यावर ED X असे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ईडीचं कार्यालय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Mumbai Latest News Today)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर नव्याने स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार हे ईडीचं सरकार असल्याची टीका विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तरही दिलं होतं. (Eknath Shinde News)

राज्यात ईडीचं सरकार आलंय पण, E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला होता. दरम्यान, आता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर E आणि D नावाचे बोर्ड लावण्यात आलं आहे. त्यामुळे हे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचे कार्यालय आहे की शिंदे आणि फडणवीस यांचा नावाने लावलेले बोर्ड आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या नावाने संस्था नोंदणीसाठी कुटुंबीयांची पूर्वपरवानगी बंधनकारक; जिल्हा कार्यालयांना निर्देश

Maharashtra Live News Update : प्रमाणपत्र वाटपाची सरकारची जबाबदारी; मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा सरकारवर बरसले

महाराष्ट्राला आखाती युद्धाची धग, राज्यातील उद्योगधंदे 'गॅस' वर

साम टीव्हीचं 'ऑपरेशन सिलिंडर', सगळ्यात मोठ्या रॅकेटचा 'साम'वर भांडाफोड

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडलं, अपघातानंतर चालक फरार

SCROLL FOR NEXT