Madgaon Jan Shatabdi Express news  AI Image
मुंबई/पुणे

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Janshatabdi Express Delayed Update News : मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पेण रेल्वे स्थानकात गाडी तीन तासांपासून रखडली आहे. प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस पेण रेल्वे स्थानकात रखडली

  • इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडी पुढे जाऊ शकलेली नाही

  • गाडी सुमारे तीन तासांपासून एकाच ठिकाणी उभी असल्याने प्रवाशांचा खोळंबा

Janshatabdi Express Train Delay: मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवासात आज मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रेल्वेच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली आहे. तब्बल तीन तासांपासून रेल्वे एकाच ठिकाणी उभी असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून मडगावकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी सुमारे सात वाजता पेण रेल्वे स्थानकात दाखल झाली. मात्र, त्यानंतर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. बिघाड दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, बराच वेळ उलटूनही गाडी पुढे रवाना न झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस ही मुंबई आणि कोकण मार्गावरील महत्त्वाची रेल्वेसेवा मानली जाते. त्यामुळे या गाडीला झालेल्या बिघाडाचा थेट परिणाम प्रवाशांच्या पुढील प्रवासावर झाला आहे. अनेक प्रवासी आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी या गाडीवर अवलंबून होते. मात्र, अचानक रेल्वे रखडल्याने त्यांच्या वेळापत्रकाचा पूर्णपणे खोळंबा झाला आहे. गेल्या तीन तासांपासून रेल्वे स्थानकातच उभी असल्याने प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

रेल्वे नेमकी कधी सुरू होणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडून बिघाड आणि गाडी सुरू होण्याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून इंजिनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर जनशताब्दी एक्स्प्रेस पुढील प्रवासाला रवाना होण्याची शक्यता आहे. मात्र, गाडीला झालेल्या विलंबामुळे प्रवाशांना आणखी किती वेळ प्रतीक्षा करावी लागणार, रेल्वे प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे प्रवासी डोळे लावून बसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matang Samaj Morcha : 'शासन निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही' मुंबईत मातंग समाज आक्रमक

Maharashtra News Live Update: पुण्यात वडगाव शेरीत मोकाट सोडलेल्या कुत्र्याचा १२ वर्षीय मुलावर हल्ला

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

SCROLL FOR NEXT