Western Railway File photos  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांच्या विश्वासाला 'तडा'; नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प

Mumbai Local train News: रेल्वेतील गर्दी, रेटारेटी आणि बिघडलेल्या वेळापत्रकाला कंटाळलेल्या रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षांना नव्या वर्षीही 'तडा' गेला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी-जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Local Update:

रेल्वेतील गर्दी, रेटारेटी आणि बिघडलेल्या वेळापत्रकाला कंटाळलेल्या रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षांना नव्या वर्षीही 'तडा' गेला आहे. नव्या वर्षात उपनगरीय लोकलगाड्यांची संख्या वाढून प्रवास अधिक चांगला होईल अशी अपेक्षा प्रवाशांना होती. पण त्या अपेक्षांचा भंग झाला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी-जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील बहुतांश नागरिक प्रवासासाठी लोकल ट्रेनवर अवलंबून असतो. कामाला जाणाऱ्या नोकरदार प्रवाशांची सकाळ आणि सायंकाळची ये-जा लोकल ट्रेनने होते. मात्र, गेल्या वर्षभरात रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे रुळाला तडा जाणे या सारख्या अनेक घटना घडल्या आहेत.

रेल्वेच्या या समस्येमुळे नोकरदार प्रवाशांना उशिरा कार्यालय गाठावं लागतं. नव्या वर्षातही हीच परिस्थिती दिसून येत आहे. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच पश्चिम रेल्वेवरील धीम्या मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंधेरी-जोगेश्वरीदरम्यान रेल्वे रुळाला तडा

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी-जोगेश्वरीदरम्यान अप थ्रू मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जलद मार्गावरची वाहतूक १५ ते २० मिनिटाने उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

आज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंधेरी येथे धीम्या मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला.यामुळे विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे ही वाहतूक जलद मार्गावरून वळविण्यात आली आहे. जलद मार्गावरील वाहतूकही उशिराने धावत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT