Mumbai Local Train Updates Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : ऐन गणेशोत्सवात मुंबई लोकलचा खोळंबा; मध्य आणि पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रवासी संतापले

Mumbai Local Train Updates : ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबई लोकलची वाहतूक खोळंबली आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन तब्बल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

Satish Daud

ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबई लोकलची वाहतूक खोळंबली आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन तब्बल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. सध्या दोन्ही मार्गावरील रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी दिसून येत आहे. रेल्वेच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी सकाळच्या सुमारास विस्कळीत आहे. त्यामुळे कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. सध्या ठाणे आणि दादर रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

लोकल पकडण्यासाठी मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.

आज पश्चिम रेल्वेवर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल गाड्या सकाळपासून 10 ते 12 मिनिटे उशिराने धावत आहेत. आज दिवसभर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगमर्यादेचा त्रास सहन करावा लागणार आहे. गणेशोत्सवात गर्दी होणार असल्याने प्रवाशांनी धावत्या लोकलमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय.

दरम्यान, रविवारी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तात असताना वाशी पोलिसांच्या एका टीमने रेल्वे प्रवाशाचा जीव वाचवला. सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेन सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गोवंडी रेल्वे स्थानकावर आली असता, धावत्या रेल्वेतून उतरत असताना एक प्रवासी फलाटावर घसरून पडला. पोलिसांच्या टीमने त्याला खेचून बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' मराठीनंतर हिंदीतही १ नंबरवर! रितेश भाऊंनी रचला इतिहास, कमावले तब्बल 'इतके' कोटी

Salman Khan: 'माझं नाव खराब होतंय...'; 'काला हिरण' चित्रपटावरून सलमान खान भडकला, थेट कोर्टात ठोकली धाव!

Veen Doghantali Hi Tutena Video : स्वानंदीचा रुद्रावतार! शेवटची संधी दिली अन् दिराला कानाखाली लगावली; समरनेही घेतला 'हा' मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी 16 उमेदवारांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra News : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक! पुणे नाशिक महामार्ग रोखला, तरुणाचा विषारी औषध पिण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT