Mumbai Local Megablock Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा होणार खोळंबा; मेगाब्लॉक कुठे अन् कसा? पाहा वेळापत्रक

Mumbai Local Sunday Mega Block News : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी (1 सप्टेंबर) रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Satish Daud

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी (1 सप्टेंबर) रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत काही ट्रेन उशिराने धावणार असून काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय.

रेल्वेने प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

या लोकल गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन स्थानकावर नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील लोकल सेवेवर देखील ब्लॉकचा परिणाम होईल.

या सर्व लोकल गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येऊन आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा स्थानकावर पोहोचतील. ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५३ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३२ वाजता सुटेल. अप धीम्या लाइनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकलही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी १०.२७ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल ठाणे येथून सायंकाळी ०४.०३ वाजता सुटेल.

दुसरीकडे हार्बर मार्गावरील कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील.

तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या मोर्च्यात नडणारी महिला सापडली? जाब विचारणारी महिला बिग बॉस फेम पूजा मिश्रा?

विधानपरिषदेच्या ९ नव्हे, तर १० जागांसाठी होणार निवडणूक; मतमोजणी आणि निकाल कधी? जाणून घ्या

गोडसेनं गोळी झाडली नसती तर हिंदू कलमा पढत असते, जैन मुनींनी उधळली मुक्ताफळं

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

कल्याण स्टेशनवर संतापजनक प्रकार! स्ट्रेचर नाही, साडीमध्ये आजीला उचलून नेलं; रुग्णालयात पोहोचताच प्राण सोडले

SCROLL FOR NEXT