Mumbai Local Train Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; आज रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द

Mumbai Local Train Mega Block : मुंबईकरांसाठी मोठी आणि अतिशय महत्वाची बातमी आहे. आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Satish Daud

मुंबईकरांसाठी मोठी आणि अतिशय महत्वाची बातमी आहे. आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावरील CSMT - चुनाभट्टी तसेच वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असेल.

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून (Mumbai Local Train) सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान वळवण्यात येतील.

या सर्व लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. तसेच ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी तसेच वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशी तसेच बेलापूर आणि पनवेलकरिता सुटणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द राहतील.

तसेच वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाऊन हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सुद्धा रद्द राहतील. याशिवाय पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT