Mumbai Local Train Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Update: रेल्वे वाहतुकीला पावसाचा तडाखा, लोकल उशिराने; ठाणे स्टेशनवर तोबा गर्दी

Mumbai Local Train Update: स्टेशनवरील वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना पोलिसांकडून लवकर घरी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Vishal Gangurde

Mumbai local Train News: मुंबईसह ठाण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे लोकल वाहतुकीचा वेग मंदावल्याने ठाणे रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. स्टेशनवरील वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना पोलिसांकडून लवकर घरी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (latest Marathi News)

मुंबई, ठाण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबई-ठाण्यातील अनेक भागातील लोकल ट्रेनचे रुळ पाण्याखाली गेले आहेत. लोकल रेल्वेचे रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. (Mumbai Local train Update)

लोकल वाहतूक उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांना घर गाठण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लोकल ट्रेन उशिराने असल्याने प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्टेशनवरील वाढत्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाने प्रवाशांना स्टेशनवर गर्दी न करता, मिळेल त्या ट्रेनने लवकरात लवकर घरी जाण्याचे आवाहन केलं आहे.

पोलिसांनी प्रवाशांना काय आवाहन केलं?

पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळेल ती गाडी पकडून तुमच्या निवासस्थानी निघून जायचं आहे. प्रवासादरम्यान, तुमच्या मौल्यवान वस्तूकडेही लक्ष द्यावे. कोणीही विनाकारण फलाटावर थांबू नये, असे आवाहन पोलिसांनी प्रवाशांना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT