कल्याण : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे शनिवारी पहाटेपासून हाल होत आहेत. कारण मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर पुन्हा एकदा परिणाम झाला आहे. कसाऱ्याच्या दिशेने धावणाऱ्या सर्व लोकलसेवा तब्बल १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि इतर महत्वाच्या स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सध्या वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. सलग दोन दिवस लोकलची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.
लोकल ट्रेनला मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लोकलची वाहतूक सातत्याने खोळंबत आहेत. कधी सिग्नल यंत्रणेतील बिघाड तर कधी ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. शनिवारी रात्री कल्याण स्थानकाजवळ एसटी लोकलचे दोन डब्बे घसरले होते.
त्यामुळे जवळपास 3 तास लोकलची सेवा विस्कळीत झाली होती. परिणामी अनेक लोकल जागेवरच थांबून होत्या. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर काम केले. या घटनेमुळे अप आणि डाऊन गाड्यांवर परिणाम झाला. दिवा डोंबिवली ठाकुर्ली दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, तीन तासांहून अधिक काळानंतर लोकलसेवा सुरू झाल्या. मात्र, याचा परिणाम आज शनिवारी देखील जाणवला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते टिटवाळा दिशेने जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.