साहिल नवनाथ थिठे याचा भांडुप रेल्वे अपघातात मृत्यू
रेल्वे रूळ ओलांडताना एसी लोकलची तरुणाला धडक
मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि लोकल वाहतूक विस्कळीत
मयूर राणे, साम प्रतिनिधी
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला, ज्यामुळे अप आणि डाऊन दिशेची धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक कोलमडली. तासनतास वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान भांडुप रेल्वे स्थानकावर दुर्घटना घडली आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडत असलेल्या एका तरुणाला एसी लोकलने जोरदार धडक दिली. या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
भांडुप रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर ही दुर्घटना घडली. मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलने रेल्वेरुळ ओलांडणाऱ्या एका तरुणाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तरुण ट्रेनच्या केबिनमध्ये अडकला. तो ट्रेनसोबत सुमारे 15 ते 20 फूट लांबपर्यंत फरफटला गेला. या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हा कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली असू त्याचे नाव साहिल नवनाथ थिठे आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत.
सकाळी दहा वाजता सिग्नल केबिनमध्ये आग लागल्यानंतर कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या पुढील सर्व सिग्नल एका बंद पडले. त्यामुळे मोटरमन्सला लोकल ट्रेन जागेवर थांबवाव्या लागल्या. एक-दोन तास उलटूनही ट्रेन एकाच जागी उभ्या असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन पुढचे स्थानक गाठले.
याच दरम्यान भांडुपमध्ये ही दुर्घटना घडलीय. दरम्यान येत्या काही तासांमध्ये सिग्नल यंत्रणा सुरळीत होऊन सुरु झालीय. आतापर्यंतच्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे संध्याकाळी गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांकडून मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी प्रचंड संतापही व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.