Mumbai Local Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Accident: मुलाच्या वाढदिवसाआधी विपरीत घडलं, कामाला गेलेले पप्पा घरी परतलेच नाही; लोकल अपघातात पोलिसाचा दुर्दैवी अंत

Mumbai Local Train Accident: मुंब्र्याजवळ झालेल्या लोकल अपघातामध्ये ठाणे जीआरपीमध्ये काम करणाऱ्या पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांच्या पाश्च्यात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलला भीषण अपघात झाला. १२ प्रवासी लोकलमधून खाली पडले. यामधील ४ जणांचा मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर कळव्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये रेल्वे पोलिसाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. विकी मुख्यादल असं या रेल्वे पोलिसाचे नाव होते आणि ते कल्याण येथे राहत होते. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातात विकी मुख्यादल यांचा मृत्यू झाला. विकी हे ठाणे जीआरपीमध्ये कार्यरत होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे विकी मुख्यादल कामावर निघाले. त्यांनी मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. पण प्रचंड गर्दी असल्यामुळे ते लोकलच्या दरवाज्यातच उभे होते. मुंब्र्या रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातावेळी ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

विकी मुख्यादल कल्याण पूर्वेकडील लोकग्राम संकुलातील सिंधू सोसायटीमध्ये राहत होते. गेल्या दोन वर्षांपासून ते या ठिकाणी राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार होता. आज सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या शेजारी राहणारे देखील हळहळले. विकी यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा कळवा रुग्णालयात गेले आहेत. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. गेल्या गुरूवारीच विकी यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला होता.

त्यांच्या शेजारी राहणारे हरीश कावळे यांनी सांगितले की, २ वर्षांपूर्वी ते आमच्या शेजारी राहायला आले होते. त्यांना एक छोटा मुलगा आहे. ते खूपच मितभाषी होते. समोर आले की ते आमच्याशी बोलायचे. आम्हाला सकाळी साडेदहाव वाजता त्यांच्या मृत्यूची बातमी कळाली. त्यांचा मृतदेह ते गावाला घेऊन गेले.'

'विकी मुख्यादल यांच्या शेजारी राहणाऱ्या स्नेहा कावळे यांनी ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे सांगितले. विकी यांच्या लहान मुलांच्या भविष्यासाठी आता सरकारने त्यांना मदत करावी या गर्दीबाबत देखील ठोस उपाययोजना कराव्यात जेणेकरून अशा घटना पुन्हा पुन्हा घडणार नाहीत.', अशी मागणी विकी यांच्या शेजारी स्नेहा कावळे यांनी केली.

विकी यांचे शेजारी संतोष आगवणे यांनी सांगितले की, 'आमच्या शेजारीच विकी मुख्याधल हे राहत होते. विकी आणि संतोष यांची चांगली मैत्री होती. गेल्या गुरुवारी विकी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे दोघे स्टेशन परिसरात भेटले देखील होते. विकी यांच्या मुलाचा देखील १७ जून रोजी वाढदिवस आहे. संतोष यांनी रेल्वे प्रशासनाने या गर्दी बाबत ठोस उपाययोजना कराव्यात आम्ही कुणाला जाब विचारणार. सरकारने लक्ष द्यावे अशी आमची मागणी आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT