Mumbai Local Stone Pelting Near Digha | Viral Video AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Mumbai Local Stone Pelting: नवी मुंबईतील दिघा परिसरात धावत्या रेल्वेवर तरुणाने दगडफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे पोलिसांकडून कारवाईची मागणी होत आहे.

Alisha Khedekar

  • नवी मुंबईतील दिघा परिसरात धावत्या रेल्वेवर दगडफेक

  • दगडफेक केल्याचा व्हिडिओ व्हायरल

  • दगडफेकीनंतर प्रवाशांकडे अश्लील हातवारे केल्याचे व्हिडिओ

  • पोलीस तपास सुरु

विकास मिरगणे, नवी मुंबई

मुंबई लोकल म्हटलं की गर्दी, धक्काबुक्की आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच चर्चेत असतो. गेल्या काही काळात लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत असतानाच आता रेल्वेच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवी मुंबईतील दिघा परिसरात एका तरुणाने धावत्या रेल्वेवर दगडफेक केल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एक तरुण रेल्वेच्या दिशेने दगडफेक करताना दिसत आहे. एवढेच नव्हे, तर दगडफेक केल्यानंतर रेल्वेतील प्रवाशांकडे अश्लील हातवारे करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा तरुण इथेच थांबला नाही तर, त्याने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ स्वतःच रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून व्हायरल केला आहे. या तरुणाचे नाव अजय शिंदे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याची अधिकृत ओळख आणि व्हिडिओबाबत रेल्वे पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित व्हिडिओची पडताळणी करून दोषी व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

धावत्या रेल्वेवर दगडफेक करणे हा केवळ गैरप्रकार नसून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दगड खिडकीतून आत गेला तर प्रवासी जखमी होण्याची शक्यता असते. तसेच चालक किंवा रेल्वेच्या महत्त्वाच्या भागाला दगड लागल्यास मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची तातडीने दखल घेऊन संबंधित तरुणाचा शोध घ्यावा आणि दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सोशल मीडियासाठी धोकादायक कृत्यांचे रील बनवण्याचा वाढता प्रकार रोखण्यासाठीही प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

Chanakya Niti: या ४ ठिकाणी दान केल्याने वाढते श्रीमंती, चाणक्यनितीतले महत्त्वाचे विचार नक्कीच वाचा

SCROLL FOR NEXT