Railways announces Central Harbour and western line mega block 12 November 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो, दिवाळीनिमित्त घराबाहेर पडताय? 'या' मार्गांवर होणार खोळंबा, जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Megablock News: विविध अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने शनिवारी रात्री आणि रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकदरम्यान काही ट्रेन उशिराने धावणार असून लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Satish Daud

Mumbai Local Megablock on Sunday

मुंबईकरांनो, दिवाळीच्या खरेदीसाठी तुम्ही घराबाहेर पडत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. विविध अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने शनिवारी रात्री आणि रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकदरम्यान काही ट्रेन उशिराने धावणार असून लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट – मुंबई सेंट्रल दरम्यान शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येईल. याशिवाय मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील सीएसएमटी – विद्याविहार, हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.

ब्लॉक कालावधीत मुख्य, हार्बर मार्गावर कुर्ला – पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मुख्य मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल.

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी हार्बर लाईनवर सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. रविवारी सकाळी ९.५३ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी ते वाशी / पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी – गोरेगाव / वांद्रे लोकल रद्द असतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५ वाजेपर्यंत ४ तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT