Mumbai Local Mega Block saam tv
मुंबई/पुणे

Mumbai local News: मध्य रेल्वेवर दोन दिवस रात्रीचा पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? काही ट्रेन रद्द , जाणून घ्या माहिती एका क्लिकवर

Mumbai local Train Update: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेवर येत्या शनिवारी-रविवारी मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणर आहे.

Vishal Gangurde

Mumbai Central Railway News:

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेवर येत्या शनिवारी-रविवारी मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणर आहे. या विशेष पॉवर ब्लॉकमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या पॉवर ब्लॉकमुळे काही ट्रेन रद्द करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. (Latest Marathi News)

मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलावर पाच मीटर रुंद गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. गर्डर टाकण्याचे काम हे शनिवारी-रविवारी (ता. १४ आणि १५) मध्यरात्री करण्यात येणार आहे.

या कामासाठी मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या पॉवर ब्लॉकमुळे लोकल वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर पाच मीटर रुंद पादचारी पूल उभारण्यात येत आहे. यामुळे चार गर्डर ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारी उशिरा रात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे.

मध्ये रेल्वेने जाहीर केलेला ब्लॉक हा मुलुंड ते कळवा डाऊन धीम्या मार्गावर शनिवार रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत असेल. तर ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याऱ्या लोकल मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. तसेच या लोकल ठाणे, कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांवर थांबतील.

टिटवाळ्यासाठी शेवटची लोकल कधी असणार?

शनिवारी रात्री ब्लॉकच्या आधी सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी शेवटची लोकल ही रात्री ११.१६ वाजता असेल. त्यामुळे सीएसएमटीवरून सुटणारी ही लोकल टिटवाळ्याला मध्यरात्री एक वाजता पोहोचेल.

तर या ब्लॉकनंतर टिटवाळ्यासाठी पहिली लोकल विद्याविहार येथून ५.११ ला सुटेल . त्यानंतर टिटवाळ्याला ६.२३ वाजता पोहोचेल. त्यानंतरच्या अन्य लोकल या वेळापत्रकानुसार धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिनेत्रीला मोबाईलवर तासन् तास रील पाहणं पडलं महागात! मान झाली वाकडी,शस्त्रक्रियेसाठी मोजावे लागले ३ लाख

Maharashtra Politics: एकही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, कंपनी स्थलांतरावर मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना उत्तर

Maharashtra News Live Update: Gen Z वर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा- राज ठाकरे

कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही? करा ‘हे’ 7 उपाय, माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने होईल धनलाभ

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! 8व्या वेतन आयोगामुळे पगारवाढ लांबणीवर? कधीपर्यंत होणार वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT