mumbai local train news
mumbai local train news  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल!

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी (Mumbai News)  महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. ( याव्यतिरिक्त बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. (Mumbai News Today)

मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या तांत्रिकी आणि अभियांत्रिकी कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत रेल्वेरुळांची, सिग्नल, ओव्हरहेड वायर यांची देखभाल दुरुस्ती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यामुळे रविवारी (5 नोव्हेंबर) काही लोकल (Local) फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.

असा असणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वे

स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार

वेळ – सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

ब्लॉक वेळेत मध्य रेल्वे मार्गावरील धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल गाड्या रद्द राहणार असून काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

स्थानक – पनवेल ते वाशी

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५

परिणाम – ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि पनवेल-ठाणे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द राहणार आहेत. या कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर, ठाणे-वाशी/नेरूळ आणि मुंबई-वाशी दरम्यान लोकल फेऱ्या धावणार आहेत.

बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.  ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील वाहतूक विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अमरावतीत अनधिकृत होल्डींगवर कारवाई सुरू

Rajasthan Accident: चालकाला लागली डुलकी अन् बस धावत्या ट्रकला धडकली; ७ जणांचा मृत्यू, ८जण जखमी

Serial TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये रंगली चुरस, झी मराठीवरील ‘पारू’ला प्रेक्षकांची पसंती

MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT