Mumbai Local Mega Block on Sunday Saam TV
मुंबई/पुणे

Mega Block on Sunday: मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 'मेगाब्लॉक'

Mumbai Local Mega Block: उद्या म्हणजेच रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गवर देखील मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेकडून देखील ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Mega Block on Sunday: मुंबईकरांनो तुम्ही जर रविवारी (१८ जून) घराबाहेर पडणार असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक जाहीर केले आहेत. उद्या म्हणजेच रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गवर देखील मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेकडून देखील ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

रेल्वेकडून तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी रेल्वेच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

रविवारी हार्बर रेल्वेलाईनवर मेगाब्लॉक

हार्बर लाईनवरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सुद्धा रविवारी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटी ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

ठाणे ते वाशी/नेरूळ आणि बेलापूर ते नेरूळ व खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. सीएसएमटी ते वाशी मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

दरम्यान, पश्चिम रेल्वेमार्गावर सुद्धा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. अंधेरी ते गोरेगाव अप आणि डाऊन धीमी मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. परिणामी ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

राम मंदिर स्थानकात फलाट उपलब्ध नसल्याने जलद लोकल स्थानकात थांबणार नाहीत. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. दरम्यान, रेल्वे विभागाकडून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीसंदर्भात दिलगिरी व्यक्त कर्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कणकवली रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ आला समोर

Dahi Poha Recipe : अवघ्या ५ मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, आंबट-गोड 'दही पोहे' एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

SCROLL FOR NEXT