मुंबईमध्ये धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकल्याचा धक्क्कादायक प्रकार समोर आला. नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. एका व्यक्तीने प्रवासादरम्यान तरुणीच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श केला. तरुणीने जाब विचारला असता आरोपीने तिला धावत्या लोकलमधून खाली फेकून दिलं. या घटनेत तरुणीचा हात कोपरापासून वेगळा झाला. या घटनेमुळे मुंबई हादरली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ही भयंकर घटना घडली. धावत्या लोकलमध्ये आरोपीने २० वर्षीय तरुणीच्या छातीला स्पर्श करत गैरवर्तन केले. आरोपीचे हे कृत्य पाहून तरुणी संतापली. तिने आधी त्याला शिवीगाळ केली तर आरोपीने देखील तिला शिव्या दिल्या. त्यानंतर तरुणीने आरोपीला चप्पल काढून मारण्यास सुरूवात केली. यावेळी आरोपीने तरुणीला धावत्या लोकलमधून धक्का दिला. पीडित तरुणी दोन डब्यांच्या मधून रुळावर पडली आणि लोकलखाली येऊन तिचा डावा हात कोपरापासून कापला गेला. या घटनेत तरुणीचा डावा हात कापला गेला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात योग्य कलमे लावली नसल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. तिच्या कुटुंबीयांनी मनसेकडे धाव घेतली. मनसे विधानसभा प्रमुख सचिन पोपळे यांनी कुटुंबीयांसह वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. या प्रकरणी आरोपीविरोधात योग्य कलमे वाढवण्याची मागणी त्यांनी केली.पोलिसांनी देखील आरोपीविरोधात कलमे वाढवण्यास होकार दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाच तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.