drug Saam Tv
मुंबई/पुणे

नवी मुंबईत क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! ३६२ कोटींचे हेरॉईन जप्त

नवी मुंबईत क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नवी मुंबईत (Mumbai) क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत ३६२.५ कोटी आहे. काल नवी मुंबई पोलिसांना अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात यश आले आहे. नवी मुंबईतील पनवेल परिसरातील आजिवली येथील नवकार लॉजिस्टिकच्या कंटेनरमधून हा साठा जप्त करण्यात आला.

सलग दुसऱ्या दिवशी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाला अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात यश आले आहे. जप्त करण्यात आलेला हेरॉईनचा साठा हा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट नेटवर्कच्या पुरवठा साखळीचा एक भाग असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केले आहे. या संपूर्ण रॅकेटच्या नेटवर्क देशातच नाहीतर जगातील इतर देशांमध्येही पसरले आहे.

मुंबईतील चित्रपट उद्योगाशी संबंधित आणि दिल्लीतील हायप्रोफाईल लोकांना अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी नेपाळमधून ड्रग्ज पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. २६ जून रोजी मुंबईतील एका संशयिताला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडून पाच कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आता हे रॅकेट नेपाळ आणि नंतर मध्य प्रदेशातील भोपाळमधून दिल्ली, महाराष्ट्र आणि यूपी या मोठ्या शहरांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्स (Drugs) तस्करांना पकडण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayank Pawar: 'मिस्टर इंडिया' आणि 'Splitsvilla 7' फेम मयंक पवारचं निधन, ३७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू

आता केरळ नाही 'केरळम' म्हणायचं! राज्याच्या नामकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी

MSRTC: आता खेड्या-पाड्यातही जाणार एसटी; दुर्गम भागातही पोहोचेल लालपरी,परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

How To Drape A Saree: साडी नेसायची सोपी पद्धत, दिसाल तुम्ही सुंदर

SCROLL FOR NEXT