Mumbai Lalbaug Raja  Saam
मुंबई/पुणे

लालबागचा राजाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर हिट अँड रन; भरधाव वाहनाने मुलांना चिरडलं; 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Mumbai Lalbaug Raja:लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू. ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू.

Bhagyashree Kamble

  • लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

  • ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू

  • अज्ञात वाहनचालकानं मदत न करता घटनास्थळावरून पलायन केलं

  • काळाचौकी पोलिस ठाण्यात हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल

वैदेगी काणेकर, साम टिव्ही

मुंबईतील लालबाग परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर, ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. ही ह्रदयद्रावक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

अज्ञात व्यक्ती भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेनं आला. त्या व्यक्तीने झोपलेल्या मुलांना धडक दिली. या धडकेत चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत जागीच मृत्यूमुखी पडली. तर जखमी मुलावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी पहाटे ३ ते ४च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांना दिली. चंद्रा वजणदार असे मृत मुलीचे नाव आहे. तर, शैलू वजणदार असे गंभीर जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे. दोन्ही मुले लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध असलेल्या रस्त्याच्या कडेला झोपले होते.

अज्ञात व्यक्ती भरधाव वाहन घेऊन विरूद्ध दिशेनं आला. त्यानं रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मुलांच्या अंगावरून गाडी नेली. यात भंयकर अपघातात दोन्ही चिमुकले चिरडले गेले. या अपघातानंतर परिसरातील लोकांनी जखमी मुलांकडे धाव घेतली. तसेच त्यांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी २ वर्षीय चिमुकलीला मृत घोषित केले. तर, ११ वर्षीय मुलावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात व्यक्तीने मात्र, कोणतीही वैद्यकिय मदत न देता तेथून पसार झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 106, 125(इ), 281, 184,187 (बी.एन.एस) 2023 भा न्या सं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT