Lalbaug mahaGanpati accident 
मुंबई/पुणे

मोठी बातमी: काळाचौकीच्या महागणपती मंडपासमोर भीषण घटना; शॉक लागून २ जणांचा मृत्यू, ५ जखमी, परिसरात खळबळ

Kalachowki cha Mahaganpati Mumbai: मुंबईच्या लालबाग परिसरात महागणपती मंडपाजवळ करंट लागून दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आठ वर्षांच्या मुलीचाही मृतांमध्ये समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Lalbaug mahaGanpati accident मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली असतानाच, रविवारी पहाटे एका दुर्दैवी दुर्घटनेने लालबाग परिसर हादरला. काळाचौकी येथील महागणपतीच्या मंडपाजवळ अचानक करंट लागल्याने २ जणांचा मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. या घटनेत ८ वर्षांच्या चिमुकलीसह एका महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच घबराट पसरली असून पोलीस आणि पालिका प्रशासन सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

घटना काय घडली?

रविवार (२० सप्टेंबर २०२६) च्या पहाटे साधारण २:२० ते ३:०० वाजेच्या सुमारास मुंबईतील लालबाग परिसरात (काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्ग) महागणपती मंडळाच्या मंडपाजवळ ५ जणांना विजेचा शॉक लागल्याची दुर्घटना घडली. गणेशोत्सवामुळे या परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी होती. त्याच वेळी मंडपाच्या जवळ अचानक वीजेचा करंट पसरल्यामुळे भीषण अपघात घडला. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

२ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत दुर्दैवाने २ जणांचा मृत्यू झाला आहे. रागिणी घनश्याम यादव (वय वर्ष ८) या लहान मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका महिलेचाही रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. विजेचा धक्का लागल्यामुळे काही लोक जखमी झाले आहेत. ३ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये किरण अकबर नाईक (१९ वर्ष), तन्वी नरेश हांडे (१९ वर्ष), साहिल संदीप तारे (१९ वर्ष) आणि रुही सिंग (१२ वर्ष) यांचा समावेश आहे.

मदत व बचावकार्य

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस, बेस्ट (BEST) चे कर्मचारी आणि पालिकेच्या वॉर्ड ऑफिसचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना तात्काळ भायखळा येथील मसिना रुग्णालय आणि परेल येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दर्शनसाठी १० किमीची रांग

लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग तब्बल १० किलोमीटरपेक्षा जास्त लांब गेली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी केली आहे. लालबाग मार्केट ते भायखळा रेल्वे स्टेशनपर्यंत ही दर्शन रांग पोहचली आहे. रविवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची सर्वाधिक गर्दी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT