Mumbai crime news Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : तरुणाला निर्घृणपणे संपवलं, हत्येनंतर उत्तर प्रदेशात निसटले; पोलिसांनी ८ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Mumbai crime news : तरुणाला निर्घृणपणे संपवल्यानंतर उत्तर प्रदेशता पळून गेलेल्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. ८ तासांत दोघांच्या मुसक्या आवळल्या यश आलं.

Vishal Gangurde

मुंबईतील अंधेरीतील गणेशनगरमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या

पोलिसांकडून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीदारांच्या मदतीने तपास

पोलिसांनी उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या आरोपींना अटक केली

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या अंधेरीतील गणेशनगर परिसरात झालेल्या हत्येचा गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी अवघ्या ८ तासांत दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवलं. अंधेरी पोलीस ठाणे आणि पश्चिम विभागाच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशनगर भागात दिनांक २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एक तरुणाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर तपास जलद गतीने सुरू करण्यात आला. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान समजले की, घटनेनंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर पोलिसांच्या चार पथकांना गोरखपूर, बहराइच आणि आसपासच्या भागात रवाना करण्यात आले. अवघ्या काही तासांत स्थानिक पोलीसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

रोहित रामनाथ यादव (वय २५ वर्षे) मनोज कुमार विश्वकर्मा (वय २५ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना मुंबईत आणून पुढील तपासासाठी अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ १० पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, एसीपी गजानन पवार, उमेश मच्छिंद्र (व. पो. नि.) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. विनोद पाटील (पीआय गुन्हे), सतीश कावनकर, सपोनी संजय कांदळकर, पोउनि किशोर परकाळे ,समाधान सुपे,सुहास पाटील, रोहन सुर्वे, (अंधेरी पोलीस ठाणे गु.प्र.क.) पो.उ.नि.मनोज भोसले मेघवाडी, सपने नागेश मिसाळ (जोगेश्वरी),चव्हाण, (एमआयडीसी), सुनील चव्हाण (साकीनाका), सुशांत बावस्कर (सहार)तसेच पो.ह. सुशील पिसाळ तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडून आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT