Mumbai Crime News  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धक्कादायक! वृद्धाने पत्नीवर धारदार शस्त्राने केला हल्ला, नंतर स्वतःलाही संपवण्याचा केला प्रयत्न

Mumbai News: धक्कादायक! वृद्धाने पत्नीवर धारदार शस्त्राने केला हल्ला, नंतर स्वतःलाही संपवण्याचा केला प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका सधन कुटुंबातील 79 वर्षीय व्यक्तीने नैराश्यातून आणि वयोमानानुसार जडलेल्या विविध आजारांना कंटाळून आपल्या 76 वर्षीय पत्नीवर खुनी हल्ला केला आहे.

या हल्ल्यातयानंतर त्या वृद्धाने स्वतःवरही हल्ला केला आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरातील मर्क्युरी रेसिडेन्सी इमारतीत विष्णुकांत बलूर (79) आणि त्यांची पत्नी शकुंतला बलूर (76) हे वृद्ध जोडपे राहत आहे. त्यांचा मुलगा युएसएमध्ये कामानिमित्त वास्तव्यास आहे. (Latest Marathi News)

विष्णुकांत 40 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आहेत. वयोमानानुसार या जोडप्याला विविध आजारांनी ग्रासले आहे. यातूनच नैराश्य आल्याने विष्णुकांत बलोर यांनी आपल्या पत्नीच्या डोक्यावर चाकूने वार करून गळा कापण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्यांनी स्वतःवरही हल्ला करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून आता दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT