Mumbai High Court Saam Tv
मुंबई/पुणे

'मुंबईने भरभरून दिले, आता परतफेड करा, हायकोर्टानं बॉलिवूड सेलिब्रेटींना फटकारलं

दिवाळीतील प्रदूषण रोखण्यासाठीच्या जनजागृती मोहिमेत मानधन मागणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले. सरकारी निधी कलाकारांवर खर्च न करण्याचे निर्देश देत प्रत्यक्ष अंमलबजावणीवरही नाराजी व्यक्त केली.

Namdeo Kumbhar

येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वायू प्रदूषण रोखण्यासाठी मोहिम हाती घेतलीय...मात्र या मोहिमेकडे बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी पाठ फिरवल्यानं उच्च न्यायालयानं खडेबोल सुनावलेत. न्यायालयानं संताप व्यक्त करताना प्रशासनाला काय ताकीद दिलीय? पाहूयात या रिपोर्टमधून.

मुंबईतील सण-उत्सवांच्या काळात होणारी फटाक्यांची आतषबाजी आणि त्यामुळे वाढणारे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण या गंभीर मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयानं आक्रमक भूमिका घेतलीय.. प्रदूषणमुक्तीच्या जनजागृती मोहिमेसाठी मानधन मागणाऱ्या बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना उच्च न्यायालयानं चांगलेच खडेबोल सुनावलेत... "मुंबईने तुम्हाला सर्वकाही भरभरून दिले आहे, आता सामाजिक कर्तव्य म्हणून सेलिब्रिटींनी या शहराची परतफेड करायला हवी," अशा थेट शब्दांत न्यायमूर्तींनी सेलिब्रेटींचे कान उपटलेत. नेमकं प्रकरण काय पाहूयात...

ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या मोहिमेत बॉलिवूड सेलिब्रेटींना सहभागी करून घेण्याचे निर्देश न्यायालयाने मागील सुनावणीदरम्यान दिले...

मात्र, सर्व सेलिब्रेटींचे ठरावीक मानधन असते आणि अशा सामाजिक उपक्रमांसाठीही ते विनामूल्य काम करण्यास तयार होत नाहीत, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाणांनी न्यायालयाला दिली.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं यावर सामाजिक कार्यासाठी पैसे मागणारे सेलिब्रिटी विनामूल्य काम करणार नसतील, तर त्यांच्याकडे जाण्याची मुळीच गरज नाही.

सर्वसामान्यांच्या करातून जमा झालेला सरकारी निधी या सेलिब्रिटींवर उधळू नका, असे सक्त आदेशच न्यायालयाने राज्य सरकारला दिले...

एकीकडे बॉलीवुड कलाकारांनी जनजागृतीसाठी पुढे आले नसले तरी काही मराठी कलाकार मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करतायत...दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कागदावर आखलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले असले, तरी प्रत्यक्ष ग्राऊंडवरील अंमलबजावणीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलीय...

मात्र मुंबईत नाव, प्रसिद्धी आणि अफाट पैसा कमावणारे बॉलिवूडचे कलाकार सामाजिक जबाबदारीवेळी हात वर करत असतील तर खरच हे समाजासाठी हिरो आहेत का? मात्र आता न्यायालयानं थेट फटकारल्यामुळे मुंबईत अमाप पैसा कमावणारे किती बॉलिवूड सेलेब्रिटी मोफत जनजागृतीसाठी पुढे येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही

Methichya Bhajiche Fayde: कडू पण आरोग्यासाठी फायदेशीर! मेथीची भाजी खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: छत्रपती संभाजीनगर: आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते

शिक्षक-पदवीधरमध्ये मोठा उलटफेर! पुण्यात भाजपच्या स्मिता जाधव पिछाडीवर, ५ जागांवर कोण पुढे, कोण मागे? धक्कादायक कल समोर

Vajarasana Benefits: जेवल्यानंतर वज्रासनात बसण्याचे चमत्कारिक फायदे! पचनक्रिया आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

Speeding Challan Rules: हायवेवर चालान मिळण्याचे टेन्शन खल्लास! १२० च्या स्पीडवरही दंड नाही; जाणून घ्या नवीन नियम

SCROLL FOR NEXT