Bombay High Court remarks on illegal arrests of protesters saam tv
मुंबई/पुणे

प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार; बेकायदा अटक खपवून घेणार नाही- हायकोर्टानं सुनावलं

Mumbai High Court On The Right To Peaceful Protest: शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. बेकायदा अटक खपवून घेणार नसल्याचे सांगत न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांकडून प्रतिज्ञापत्र मागवले.

Omkar Sonawane

वैदेही काणेकर, साम टीव्ही

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे मत नोंदवले आहे. प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत, कोणाचीही बेकायदा अटक खपवून घेतली जाणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र आंदोलकांच्या अटकेबाबत कोणतेही मनाई आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

या प्रकरणी आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या धरपकडीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदानातून सुमारे 600 जणांना तर 11 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथून सुमारे 300 जणांना ताब्यात घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान आंदोलकांसह महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार मान्य करतानाच अटकेबाबत सरसकट मनाई आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांकडून काय भूमिका मंडळी जाते. याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT