MUMBAI HIGH COURT CLERK EXAM CHAOS; TYPING TEST DISRUPTED, STUDENTS PROTEST saam tv
मुंबई/पुणे

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड; परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या

Mumbai High Court Typing Test: मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टमध्ये तांत्रिक अडचणींचा आरोप करण्यात आलाय. कल्याणमधील परीक्षा केंद्रावर सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने गोंधळ उडालाय.

Bharat Jadhav

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान कल्याणमध्ये गोंधळ झाला.

  • कॉम्प्युटर सुरू झाल्यानंतर सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

  • सीटींग आणि परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनाबाबतही उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले.

मुंबई हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान गडबड झाल्याचा आरोपाने गोंधळ उडालाय. कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले होते, मात्र परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

सीटींग व्यवस्थेचं योग्य नियोजन नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रावर कोणतीही स्पष्ट व्यवस्था व तपासणी नसल्याची तक्रार देखील विद्यार्थ्यांनी केली. टेस्टसाठी कॉम्प्युटर सुरू झाल्यानंतरही सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने टायपिंग टेस्ट रखडली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. सकाळी 10 वाजताच्या सत्रातील उमेदवार अडकले असतानाच सव्वा बारा आणि 3 वाजताच्या सत्रातील शेकडो विद्यार्थीही परीक्षा केंद्रावर पोहोचले. परीक्षार्थींची गर्दी वाढल्यानं गोंधळ उडाला.

जवळपास 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर संताप व्यक्त करत निषेध आंदोलन केले. पालकांनीही व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे दूरवरून आलेल्या उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. दरम्यान वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ,परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे.

या सर्व प्रकारावर संस्थेचे संचालक संजय वानखेडे यांनी प्रतिक्रिया देताना कोणत्या कारणामुळे गडबड झाला ते सांगितलं. तांत्रिक अडचणीमुळे प्रिंट प्रक्रिया उशिराने होत असल्याचे सांगत समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. या सर्व गोंधळाचा विचार करून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री येणार म्हणून घाईघाईत काम, चाकण तळेगाव रोडवर एका तासातच कामाचा बोजवारा

श्रावणात उपवास धरल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या ‘हे’ ५ फायदे

वंदे भारत की अमृत भारत? स्पीडपासून तिकीटदरापर्यंत, दोन्ही ट्रेनमध्ये काय फरक?

हॉर्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी गोळ्या-औषधांऐवजी करा ही 6 योगासने, एकदम फिट राहाल

Pune BJP : पुण्यात भाजपचा 'ट्रिपल स्ट्रोक'! निवडणुका नसतानाही तिघांचा पक्षात प्रवेश

SCROLL FOR NEXT