Mumbai Local News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local News : हार्बर मार्गावर भयंकर अपघात! लोकलखाली येऊन तरुणाचा मृत्यू, लोकल वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Mumbai Railway Late Mark : मुंबईतील हार्बर मार्गावर गोवंडी–चेंबूरदरम्यान रेल्वेखाली येऊन एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हार्बर मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे विस्कळीत झाल्या असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Alisha Khedekar

  • मानखुर्द–कुर्ला दरम्यान रेल्वेखाली अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

  • गोवंडी–चेंबूरदरम्यान घडली ही दुर्घटना

  • हार्बर मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे विस्कळीत

  • वाशी–सीएसटी गाड्यांवर परिणाम, प्रवाशांचे हाल

सूरज म्हसूरकर, मुंबई

मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द् वरून कुर्ल्याच्या दिशेला जाताना गोवंडी चेंबूर दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा गाडी खाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हार्बर मार्गावरील वाहतूक गेले १० ते १५ मिनिटे रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाशीकडून सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास हार्बर मार्गावरील मानखुर्द् वरून कुर्ल्याच्या दिशेला गोवंडी चेंबूर दरम्यान एका अज्ञात तरुणाचा भयंकर अपघात घडला आहे. रेल्वेखाली येऊन या तरुणाचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाचा अपघातादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर हार्बर रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे.

अपघातात मृत पावलेला तरुण नेमका कोण आहे? त्याचा अपघात झाला की आत्महत्या आहे याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. घडलेल्या घटनेने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदार वर्गाला मात्र त्याचा फटका बसला आहे. तसेच लोकलमधील प्रवाशांचा खोळंबा झाला असून. घटनास्थळी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reliance Jioचे नवे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वाचा संपूर्ण लिस्ट

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT