Govandi Fire Saam tv
मुंबई/पुणे

Govandi Fire: मुंबईत अग्नितांडव! गोवंडीत दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

Govandi Fire News: मुंबईच्या गोवंडीत आगीची घटना घडली आहे. गोवंडीच्या झाकीर हुसैन नगरमध्ये एका दुकानात सिलिंडरचा स्फोटचा झाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Mumbai Govandi Fire News:

मुंबईच्या गोवंडीत आगीची घटना घडली आहे. गोवंडीच्या झाकीर हुसैन नगरमध्ये एका दुकानात सिलिंडरचा स्फोटचा झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामुळे दुकानाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीतील झाकीर हुसेन नगरमध्ये एका दुकानाला आग लागली. दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पोलीस घटनास्थळी झाले.

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुकानाला नेमकी आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या दुकानाला आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच सिलिंडरचा स्फोट झाल्यानेही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

झोपडपट्टीतील घरांना लागली आग

गोवंडीच्या झाकीर हुसैन नगरमधील काही घरांनाही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. एकमेकांना खेटून असलेल्या घरांनाही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीत जीवितहानी झाली नाही. आग लागलेली घरे ही पत्र्याची होती. नाल्याजवळील असलेल्या या झोपडपट्ट्यांना लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना कठीण गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

SCROLL FOR NEXT