NESCO DRUG CASE: INTERNATIONAL DRUG RACKET ANGLE EMERGES IN MUMBAI POLICE PROBE Saam Tv
मुंबई/पुणे

NESCO Drug Case : गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणाचं युरोप कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Goregaon NESCO Drug Case Update : गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात युरोप कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • नेस्को ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा संशय

  • मुख्य आरोपी महेश खेमलानी याची पोलीस कोठडी 10 मेपर्यंत वाढवली

  • युरोपमधून सुमारे चार हजार एक्स्टसी गोळ्या भारतात आणल्याची माहिती

  • ड्रग्ज व्यवहारासाठी युएसडीटी डिजिटल वॉलेटचा वापर

संजय गडदे, मुंबई

गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रातील ड्रग्ज प्रकरणात पोलिस तपासाला मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश हिरो खेमलानी उर्फ मार्क याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला बुधवारी बोरिवली लोकल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी रविवार, 10 मेपर्यंत वाढवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जचे अतिसेवन केल्याने दोन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध भागांतून अनेक आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात महेश खेमलानी हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. तपासादरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. महेशचा युरोपमधील एका मित्राशी संपर्क होता आणि त्याच्यामार्फत परदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागवले जात होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या मित्राने आतापर्यंत सुमारे चार हजार एक्स्टसी गोळ्या भारतात पाठवल्या होत्या. त्यापैकी 935 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या असून उर्वरित गोळ्या कुठे वितरित करण्यात आल्या याचा तपास सुरू आहे.

महेश, आयुष आणि विनीत यांची मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. त्याच बैठकीत युरोपमधून ड्रग्ज मागवण्याचा व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मुंबईसह गोवा आणि इतर शहरांमध्ये या गोळ्यांचे वितरण करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड महेशच असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याने काही तरुणांना आपल्या कामासाठी वापरले होते. जलद श्रीमंत होण्याचे आमिष दाखवत त्यांना ड्रग्ज तस्करीच्या व्यवहारात ओढण्यात आले होते. पोलिसांच्या तपासानुसार, ड्रग्ज व्यवहारातील पैशांची देवाणघेवाण युएसडीटी (USDT) या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून केली जात होती. तसेच भारतीय चलन परदेशात रूपांतरित करण्यासाठी एका एजंटची मदत घेतली जात असल्याची माहितीही पुढे आली आहे.

महेशचे परदेशातील काही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांशीही संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून संबंधित युरोपीय नागरिकाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे मुंबईतील पार्टी कल्चर, म्युझिक कॉन्सर्ट आणि ड्रग्ज नेटवर्क पुन्हा एकदा चर्चेत आले असून युवकांमध्ये वाढत्या ड्रग्जच्या विळख्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या रॅकेटशी संबंधित आणखी आरोपींचा शोध सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT