Mumbai Accident News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघाताचा थरार; बेस्ट बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Mumbai Best Bus Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. बेस्ट बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानांतर वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली होती .

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत अपघाताचं सत्र सुरुच आहे. मुंबईच्या गोरेगाव आरे कॉलनीत भीषण अपघात झाला आहे. गोरेगावात बेस्ट बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबईत बेस्ट बसच्या अपघाताचं सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ला येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मुंबईच्या गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने बेस्ट बसला धडक दिली. दुचाकीस्वाराने बेस्ट बसला समोरून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर मृत तरुणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव विलेपार्लेच्या कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मुलुंड ते गोराई मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 460 चे अपघातात मोठे नुकसान झाले आहे. आरे पोलीस ठाणे परिसरात मुख्य रस्त्यावर अपघात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

कोस्टल रोडवर भीषण अपघात

मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारचा हा अपघात हाजीअली परिसरात झाला आहे. दुभाजकाला धडकून उलटून अपघात झाला आहे. या अपघातात तरुण-तरुणी जखमी झाले आहेत. दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातातील जखमी तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी तरुणीवर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हाजीअली परिसरातील मुख्य रस्त्यावर अपघाताची घटना घडली आहे कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं. कार थेट दुभाजकाला आदळल्याने अपघात झाला आहे. भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT