MNS Jagar Yatra Saam TV
मुंबई/पुणे

MNS Jagar Yatra: मनसेच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

MNS Jagar Yatra Traffic Jams: पदयात्रेमुळे सामान्य नागरिकांना मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडींचा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आलीये.

साम टिव्ही ब्युरो

अमोल कलये साम टीव्ही रत्नागिरी

MNS Padyatra:

मुंबई गोवा महामार्गावरून मनसेने भाजपला लक्ष केलं आहे. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतलीये. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने जागर पदयात्रा काढली आहे. मात्र या पदयात्रेमुळे सामान्य नागरिकांना मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आलीये.

मनसेच्या जागर यात्रेचा फटका मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-या वाहन धारकांना बसतोय. सकाळपासून मनसेचं आंदोलन मुंबई गोवा महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा अडथळा सहन करावा लागत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. या वाहतूक कोंडीचा मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागतोय. जागर यात्रेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीये.

मुंबई-गोवा महामार्गावरुन अनेक चाकरमानी सकाळच्यावेळी प्रवास करत असतात. सकाळी ७ वाजल्यापासूनच या यात्रेला सुरूवात झाल्याने कामावर जाण्यासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT