मुंबई/पुणे

Shocking! मुंबईतील के.व्ही.के शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार; कापूर पडलेल्या तेलात तळले वडे?

Ghatkopar KVK School: मुंबईतील घाटकोपर केव्हीके शाळेतील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. दुसऱ्यांदा येथे विषबाधेची घटना घडलीय. विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कॅटीन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Bharat Jadhav

  • सहा विद्यार्थ्यांना विविध रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय.

  • वडापाव, समोसे खाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला.

  • कॅटीन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

मयूर राणे, साम प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनो,शाळेच्या कॅटीनमधून पदार्थ आवडीनं खाताय तर सावधान, कॅटीनमधील तळलेले पदार्थ खाल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मुंबईतील एका शाळेत घडलीय. घाटकोपरमधील नामंकित के.व्ही. के घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज. ही तीन मजली टोलेजंग शाळा. यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणारा प्रकार घडला. येथील कॅटीनमधील वडापाव आणि समोसे खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विशेष म्हणजे विषबाधेचा प्रकार दुसऱ्यांदा घडलाय.

घाटकोपरच्या के.व्ही. के शाळेत हा प्रकार घडलाय. शाळेतील १५ ते २० विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. या विद्यार्थ्यांनी कँटीनमधील वडे, समोसे खाल्ले होते. त्यानंतर त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. मिळालेल्या माहितीनुसार के.व्ही. के शाळेत दुसऱ्यांदा हा विषबाधेचा प्रकार घडलाय. शाळेतील १५ ते विद्यार्थ्यांनी वडापाव खाल्ला त्यानंतर त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ राजावाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवलं.

विषबाधेचा प्रकार घडल्यानंतर पोलीसांची एक तुकडी शाळेत दाखल झाली. त्यांनी तेथील कॅटीनची तपासणी केली. त्यावेळी वडे, समोसे तळलेल्या तेळात कापूर आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कॅटीन बंद करत कॅटीन चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.कॅटीनमधील पदार्थ खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT