Mumbai Ganeshotsav 2026 saam tv
मुंबई/पुणे

गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! 'या' चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत DJ-स्पीकर वाजवण्याची परवानगी

Mumbai Ganeshotsav 2026 Loudspeaker Permission Till Midnight: मुंबईतील गणेश मंडळांना मोठा दिलासा! गणेशोत्सव २०२६ दरम्यान चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे. जाणून घ्या परवानगीचे चार दिवस आणि नियम.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांना विसर्जन आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रात्री उशिरापर्यंत करता येणार आहे. यंदा मुंबई शहरासाठी वर्षभरातील विविध सणांसाठी एकूण १५ दिवस ध्वनिक्षेपक वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये गणेशोत्सवासाठी चार दिवसांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील दिवसांची यादी यापूर्वीच जाहीर केली होती.

गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १५ सप्टेंबर २०२६, पाचव्या दिवशी १८ सप्टेंबर, गौरी विसर्जनाच्या दिवशी १९ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ध्वनिप्रदूषण नियमांनुसार वेळेची मर्यादा

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार सामान्यतः रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास निर्बंध आहेत. मात्र सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी वर्षातील काही ठरावीक दिवसांना रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची विशेष परवानगी देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. मुंबई शहरासाठी वर्षभरातील विविध सणांसाठी १५ दिवस निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी चार दिवस गणेशोत्सवासाठी देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुका तसेच स्थानिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यास काहीसा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी गणेशोत्सवातील चारही दिवस विसर्जनाचे कार्यक्रम असल्याने मंडळांना स्थानिक कार्यक्रमांसाठी आणखी एक दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीवर प्रशासनाकडून पुढील निर्णय होतो का, याकडे गणेश मंडळांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंचा कार्यक्रम घेतला तर धिंगाणा होईल; जरांगेंचा शिंदेसेनेच्या खासदाराला थेट इशारा

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव गाडीनं आधी दोघींना उडवलं, नंतर कार 25 फूट खड्ड्यात उलटली

कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी; महामार्गावर अपघाताचा थरार

Maharashtra News Live Update: पुण्यातल्या DJ च्या वादात मनसेची उडी, थेट एकनाथ शिंदेंना केलं टार्गेट

Floor Cleaning Tips : फरशी रोज चकाचक करता, तरी धूळ पुन्हा येते? सफाई करताना या चुका तर करत नाही ना?

SCROLL FOR NEXT