mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! माहीममध्ये भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Mumbai Mahim Fire : मुंबईच्या माहीममध्ये आगीची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

अहमदाबादमध्ये विमान अपघातानंतर स्फोट होऊन २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतही अग्नितांडव पाहायला मिळालं. मुंबईच्या माहीमध्ये आग लागल्याची घटना घडली. एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आगीची भीषण दुर्घटना घडली. या आगीत होरपळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या आगीची मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील माहीम परिसरात एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आगीची मोठी दुर्घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं. माहीम परिसरात लागलेल्या या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला.

माहीममध्ये एसी टेंपरेचरच्या स्फोटाने होरपळून आणि शरीर मोठ्या प्रमाणात फाटल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाचे जवान महापालिकेचे कर्मचारी आणि माहीम पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत आगीत अडकलेल्या बाकीच्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. याप्रकरणी माहीम पोलीस आणि अग्निशमन दल अधिकचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माहीममधील मखदूम शाह दरगाह परिसरातील एका खानावळीत एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तिघे जखमी झाले. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर सहा वाजून १७ मिनिटाला आग लागली. आग लागल्यानंतर सहा वाजून ४० मिनिटाला आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीच्या घटननेतर प्रवीण पुजारी (34), मुकेश गुप्ता (34) आणि शिवमोहन (24) यांना रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Fort : मुंबईत असूनही पर्यटकांच्या नजरेआड राहिला वरळीचा किल्ला, 'या' गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या आहात का?

Maharashtra News Live Update: धुळ्यात वाहन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आजपासून राज्यात सुट्टे तेल विक्रीवर बंदी; नियम मोडाल तर खबरदार

JPSC exams : सोरेन सरकारला जोरदार झटका; JPSC परीक्षा-नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टाकडून स्थगित

Unisex Silver Bracelet : महिला असो वा पुरुष, दोघांसाठीही परफेक्ट! चांदीच्या ब्रेसलेटचे 5 युनिक पॅटर्न

SCROLL FOR NEXT