Dhanshri Shintre
मुंबईतील माहीम उपनगराचा इतिहास १३व्या शतकापासून सुरू होतो, जो आजही त्याच्या सांस्कृतिक वारशात दिसून येतो.
१३व्या शतकात माहीमचा प्राचीन नाव महिकावती होता आणि ती राजा भीमदेव यांची राजधानी मानली जात होती.
माहीम हे एक प्रमुख व्यापारी बंदर होते, जे त्याच्या सुरक्षित स्थानामुळे आणि महत्त्वाच्या भूगोलिक ठिकाणामुळे फळत होतं.
राजा भीमदेव युद्धात हरल्यानंतर मुंबईजवळ नवीन राजधानी वसवली आणि तिलाही माहीम हेच नाव दिले, असं सांगितलं जातं.
माहीम हे मुंबईच्या सात बेटांपैकी एक असून, येथे पारंपरिक कोळीवाड्यांमध्ये कोळी समाज आजही आपल्या संस्कृतीसह वास्तव्य करत आहे.
हळूहळू माहीमने प्रगती केली आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक संस्थांनी भरलेला एक समृद्ध आणि बहुविध समाजजीवन असलेला परिसर बनला.
माहीम विविध धर्मीय लोकांच्या सहवासामुळे ओळखले जाते आणि येथे मंदिरे, चर्च, मशिदी व अग्निमंदिरे आढळतात.