Drug Case: शाहरुखचा मुलगा आर्यनला एनसीबीनं घेतलं ताब्यात; चौकशी सुरु Saam TV
मुंबई/पुणे

Drug Case: शाहरुखचा मुलगा आर्यनला एनसीबीनं घेतलं ताब्यात; चौकशी सुरु

मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Cruz Drugs Party) ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Cruz Drugs Party) ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Aryan Khan) मुलगा आर्यनचे नावही पार्टीमध्ये समोर आले आहे. त्याची एनसीबी टीमकडून चौकशी केली जात आहे. तर या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यनच्या चौकशीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की ज्या लोकांची चौकशी केली जात आहे. त्यात शाहरुखचा मुलगा आर्यनचा समावेश आहे. आर्यनला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही, असेही वानखेडे यांनी सांगितले.

एनसीबीच्या चौकशीत आर्यनने असाही दावा केला आहे की, त्या पार्टीमध्ये त्याला आमंत्रित करण्यात आले होते. सूत्रांनी असेही सांगितले की क्रूझच्या आत जात असलेल्या पार्टीचा एक व्हिडिओ एनसीबीने मिळाला आहे, ज्यामध्ये आर्यन दिसत आहे. पार्टी दरम्यान आर्यनने पांढरा टी-शर्ट, निळी जीन्स, लाल ओपन शर्ट आणि टोपी घातली होती. एनसीबीशी संबंधित सूत्रांकडून असेही समजले आहे की ज्यांना पकडले गेले आहे, त्यांच्याकडून रोलिंग पेपर देखील सापडले आहेत.

मोबाईल फोन जप्त, एनसीबी चॅट्स तपासत आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यनचा मोबाईल जप्त केला आहे. त्याच्या मोबाईलवरून मिळालेल्या चॅट्सची छाननी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या उर्वरित लोकांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. तिन्ही बड्या उद्योगपतींच्या मुली सांगितल्या जात आहेत. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयातून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा तपास कायद्याच्या कक्षेत राहूनच केला जात आहे. ज्याचा यात समावेश आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती एनसीबीकडून दिली आहे.

टीपच्या आधारे एनसीबीने लावला छडा.

झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. ते आपल्या टीमसह मुंबईत जहाजावर चढले. पण जेव्हा शिप बीच समुद्रात पोहचले तेव्हा तिथे ड्रग पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीमध्ये ड्रग्जचे सेवन मोठ्या प्रमाणात दिसून आले. दिल्लीस्थित नमास्क्रे एक्सपीरियन्स या कंपनीने या पार्टीचे आयोजन केल्याचे वृत्त आहे, एका प्रवाशाच्या तिकिटाची किंमत 80 हजार रुपये होती. ज्या जहाजावर ही कारवाई करण्यात आली आहे ते मुंबईचे कॉर्डेलिया क्रूझ आहे. समुद्राच्या मध्यभागी चालणाऱ्या ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून एनसीबीने दहशत निर्माण केली आहे. एनसीबीचे समुद्रातील आतापर्यंतचे हे पहिले आणि मोठे ऑपरेशन आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT