toxic relationship mental harassment cases :  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

'तू फ्रिजमध्ये सापडशील...' बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून डेंटिस्ट तरुणीची आत्महत्या; ६ पानांच्या सुसाईड नोटने मुंबई हादरली

Antop Hill suicide news today : मुंबईतील अँटॉप हिल परिसरात २४ वर्षीय एमडीएस विद्यार्थिनी स्तुती सोनवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

toxic relationship mental harassment cases : मायानगरी मुंबईतील हाय-प्रोफाइल परिसरात एका डेंटिस्ट तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (MDS) ची विद्यार्थिनी २४ वर्षीय स्तुती सोनवणे हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. स्तुती आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. पोलिसांना तिच्या खोलीत ६ पानांची सुसाईड नोट सापडली, त्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. स्तुतीने टॉक्सिक बॉयफ्रेंडच्या छळामुळे हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटवरून उघड झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

६ पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुसाईड नोटमध्ये दिल्लीतील भयानक श्रद्धा वालकर हत्याकांडाचा उल्लेख आहे. श्रद्धा वालकर या २७ वर्षीय मुलीची तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने हत्या केली होती. आफताबच्या रेफ्रिजरेटरमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे सापडले होते.

नोटमध्ये स्तुतीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या बिघडलेल्या नात्याचा उल्लेख केला. तिने लिहिले की, तिचा पार्टनर सतत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि मानसिक छळ करायचा. स्तुतीच्या सुसाईड नोटमध्ये असे म्हटले आहे की, तिच्या मैत्रिणींना तिच्या बॉयफ्रेंडकडून होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल माहिती होती. त्या अनेकदा मस्करीत म्हणत असत की, 'एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील.'

मृत्यू कसा उघड झाला?

स्तुती तिच्या आई-वडील आणि बहिणीसोबत मुंबईतील अँटॉप हिल परिसरात राहत होती. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही, तेव्हा आई-वडिलांनी तिला हाक मारली. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पालकांनी जेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा ती छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ६ पानांची सुसाईड नोट जप्त केली असून सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT